Maharashtra : ठरलं! सगळ्या जिल्ह्यांना याच आठवड्यात पालकमंत्री मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde - Devendra Fadnavis
Maharashtra : ठरलं! सगळ्या जिल्ह्यांना याच आठवड्यात पालकमंत्री मिळणार

Maharashtra : ठरलं! सगळ्या जिल्ह्यांना याच आठवड्यात पालकमंत्री मिळणार

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता जवळपास तीन महिने लोटले आहेत. मात्र अद्याप खातेवाटप पूर्ण झालेलं नाही. तसंच अजूनही राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. त्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात असतानाच आता सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती हाती येत आहे.

हेही वाचा: भूखंड वाटपावरील स्थगिती मागे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे ३६ जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन या नियुक्त्या खोळंबल्या होत्या. अतुल सावे की संदीपान भुमरे कोण पालकमंत्री होणार, असा प्रश्न होता. मात्र आता हे पद शिंदे गटाकडे जाणार आहे. संदीपान भुमरे औरंगाबादचे नवे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे आता हा तिढा सुटला आहे.

हेही वाचा: Eknath Shinde: भाजपलाच धक्का; 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

कॅबिनेट मंत्र्यांना किमान दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातला विस्तार झाल्यावर राज्यमंत्र्यांनाही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. याच आठवड्यात पालकमंत्री घोषित होणार आहेत. पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबली होती. विरोधकांकडूनही या मुद्द्यावरुन टीका केली जात होती. मात्र आता हा तिढा सुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

Web Title: Guardian Ministers To Be Alloted To All 36 Districts In Maharashtra In This Week Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..