कोरोनामुक्तीची गुढी : ढोला-ताशांचा गजर, लेझीमचा ताल

Gudi Padwa 2022
Gudi Padwa 2022esakal
Summary

राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.

Gudi Padwa 2022 : राज्य सरकारनं (Maharashtra Government) कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध 31 मार्च रोजी हटवले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत गुढीपाडवा मंडळांनी केलंय. गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे.

यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्यानं राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळं गुढीपाडवा साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारनं गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिलीय.

Gudi Padwa 2022
'कोल्हापुरात जयश्री जाधवांचा विजय ही काळ्या दगडावरील पांढरी रेष'

गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मुंबई आणि पुण्यातील शोभायात्रांची शान काही वेगळीच असते. दरम्यान, दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com