विठ्ठलाच्या कृपेमुळे मंत्रिपद - गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पंढरपूर - "मी टपरी चालविणारा एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. पुढे आमदार झालो. यापेक्षा अजून मला काय हवे आहे', असे सांगत विठ्ठलाच्या कृपेमुळेच मंत्री होण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञतेची भावना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (रविवारी) पंढरपुरात व्यक्त केली.

पाटील आज सकाळी विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनाला जाण्यापूर्वी त्यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेने व विठ्ठलाने भरपूर काही दिल्याचे समाधान व्यक्त केले. पाटील म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी मी विठ्ठल दर्शनासाठी आलो होतो, त्या वेळी मला मंत्रिमंडळात स्थान मिळू दे, असे विठ्ठलाला साकडे घातले होते. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईला या, असा निरोप मिळाला आणि 8 जुलै 2017 रोजी राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली. विठ्ठलाच्या कृपेनेच हे घडले. म्हणूनच आज मी विठ्ठल दर्शनासाठी आलो आहे.

Web Title: Gulabrao patil Vittal Darshan Pandharpur