शिवरायांच्या विटंबनेनंतर गुलाबराव पाटील आक्रमक; कर्नाटकला इशारा

...तर कर्नाटकचे पाणी बंद करु; महाराष्ट्राचे मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil
Gulabrao PatilEsakal

बेळगाव : कर्नाटक (Karnatka) सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)अवमान थांबवावा. न झाल्यास कर्नाटकचे पाणी बंद करु, असा इशारा महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे महाराष्ट्राच्या विविध पक्षीय नेत्यांची भेट घेऊन सीमाभागात सुरु असलेल्या दडपशाहीची माहिती दिली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी, शिवसेना (Shivsena)नेहमीच सीमावासियांच्या पाठिशी राहिली आहे. मात्र, सीमावासियांवर अन्याय सुरु राहिल्यास कर्नाटकाचे पाणी बंद करुन धडा शिकवावा लागेल, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम तथा सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही युवा कार्यकर्त्यांनी घेतली.

मराठी युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे मराठी भाषिकांत भितीचे वातावरण आहे. याची दखल घेण्यासह बेळगावला (Belguam) भेट द्यावी, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. यावर मंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार बेळगाव सीमावर्ती भागातील मराठीबांधवांसोबत आहे. युवकांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कर्नाटक सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही दिली.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांचीही कार्यकर्त्यांनी भेट घेतली. मंत्री सामंत यांनी, गरज पडल्यास कर्नाटकात जाऊन कार्यकर्त्यांवरील खटले मागे घ्यावेत यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती दिली. युवा समितीचे सचिव श्रीकांत कदम, सूरज कणबरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, किरण मोदगेकर, रवी निर्मळकर, सिद्धार्थ चौगुले, आशिष कोचेरी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री बोम्मईंशी चर्चा करु

बेळगाव सीमाभागातील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी युवा समितीच्या कार्यकर्त्यांना दिली. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात फडणवीस यांची भेट घेऊन सीमाभागातील परिस्थितीची माहिती दिली. मराठी भाषिकांवरील अन्याय दूर व्हावा. सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com