Maratha Reservation : ...तर पाटील आणि फडणवीस जबाबदार असतील : ऍड. सदावर्ते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

ऍड. सदावर्ते म्हणाले, न्यायालयाचा मराठा आरक्षणाबाबतचा आज दिलेला निर्णय घटनाबाह्य आहे. हा निर्णय ज्युडिशियल डिसिप्लिनच्या विरोधात आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी हे प्रकरण त्यांच्यासमोर चालवायला नको होते.

मुंबई : "वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील, आणखीन एक पोलिस अधिकारी श्री. जाधव आणि मराठा संघटनांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझे उद्या जर काही बरेवाईट झाले तर वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील ,"असा खळबळजनक आरोप ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

ऍड. सदावर्ते म्हणाले, " न्यायालयाचा मराठा आरक्षणाबाबतचा आज दिलेला निर्णय घटनाबाह्य आहे. हा निर्णय ज्युडिशियल डिसिप्लिनच्या विरोधात आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी हे प्रकरण त्यांच्यासमोर चालवायला नको होते.''

ऍड. सदावर्ते पुढे म्हणाले, " आजचा निर्णय हा मराठा युवकांच्या दबावाखाली झालेला आहे. यामुळे खुल्या गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणारा आहे. मंत्री विनोद तावडे यांना आज सकाळीच हा निकाल आपल्या बाजूने होणार हे कसे कळाले होते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीत आजच एक मंत्री का पाठवून ठेवावा लागला?''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gunaratna sadavarte allegations on Devendra Fadanvis and IPS Vishwas nangre patil