राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट उंची लागते मात्र.., सदावर्तेंचे शरद पवारांवर टीकास्त्र

शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत
gunaratna sadavarte on sharad pawar
gunaratna sadavarte on sharad pawar
Summary

शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत, सदावर्तेंचा टोला

सध्या देशात राष्ट्रपती पदासाठी राजकीय पक्षांतील वातावरण तापलं आहे. राष्ट्रपती पदासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपसह विरोधकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या निवडणुकीमुळे अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला असून पक्षातील नेत्यांचे आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, आता एक वेगळी राजकीय बातमी समोर येत आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी या वादात उडी घेतील असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. (gunaratna sadavarte on sharad pawar)

अकोल्यात पत्रकारांशी बोलत असताना सदावर्ते यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट राजकीय उंची लागते. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे? कारण, राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट उंची लागते, अशी खरमरीच टीका त्यांनी केली आहे.

gunaratna sadavarte on sharad pawar
या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राज्य सरकार अन्यायी राज्य करत आहे. राज्यात महिला, कष्टकऱ्यांवर अन्याय होत आहे. या सरकारला मत का देऊ नये, हे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागरण करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. देशाच्या संविधानात मोठी ताकद आहे. राजकारणाला मी अस्पृश्य मानत नाही. त्यामुळे राजकारणात कधी जाणार, ते योग्य वेळी जाहीर करेन, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

ओबीसी जनगणना घरोघरी जाऊन सर्वेक्षणाद्वारे होत नसल्याची धक्कादायक बाब कळली आहे. केवळ टेबलवर बसून आडनावावरून मोघमपणे जनगणना केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला आपला पाठिंबा आहे. मुंबईतून त्याला बळ देऊ, असंही सदावर्ते यांनी सांगितलं आहे.

gunaratna sadavarte on sharad pawar
टोमॅटोसारखे गाल असणाऱ्या NCP नेत्याचं हे षडयंत्र, सदाभाऊंचा रोख कुणावर?

विजय मालोकार यांच्या फिर्यादीवरून एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केल्याच्या आरोपात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह चार जणांवर अकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अकोट न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com