Maratha Reservation : आरक्षण विरोधी याचिका सादर; तूर्तास स्थगिती नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मराठा आरक्षण संबंधी दोन याचिका दाखल झाल्या असून दुसरी याचिका निर्णयाच्या समर्थनाची आहे. सदावर्ते यांनी निर्णयावर स्थगिती मागितली आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश आणि मेगा भरती राज्य सरकार करणार आहे, त्यामुळे लवकर सुनावणी घ्यावी, अशी याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. सरकारकडून सविस्तर सुनावणीसाठी अवधी हवा, असे सांगण्यात आले.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. मात्र, आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेवर आता 10 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज दुपारी न्यायालयात याचिका सादर केली. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर याचिकेकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका सादर केली. सदावर्ते म्हणाले, मेगाभरतीबाबत राज्य सरकारकडे उत्तर दिले नव्हते. न्यायालयाने या याचिकेवर 10 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 68 टक्के आरक्षण झाल्याने इतर समाजाला फक्त 32 टक्के जागा राहिल्या आहेत. 

मराठा आरक्षण संबंधी दोन याचिका दाखल झाल्या असून दुसरी याचिका निर्णयाच्या समर्थनाची आहे. सदावर्ते यांनी निर्णयावर स्थगिती मागितली आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश आणि मेगा भरती राज्य सरकार करणार आहे, त्यामुळे लवकर सुनावणी घ्यावी, अशी याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. सरकारकडून सविस्तर सुनावणीसाठी अवधी हवा, असे सांगण्यात आले.

मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंबेडकर अॅडव्होकेट असोसिएशन आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनलीस्ट कॉन्सिलच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता सरकारला मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढाई लढावी लागणार आहे. 

Web Title: Gunratna Sadavarte filed petition against Maratha Reservation in Mumbai High Court