सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; कोल्हापूर पोलिसांकडे ताबा

मराठा आरक्षणासंबंधित केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर सातारा, कोल्हापूर, अकोला पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल
Gunratna Sadavarte Possession of Kolhapur police Stay in jail for other crimes sharad pawar mumbai
Gunratna Sadavarte Possession of Kolhapur police Stay in jail for other crimes sharad pawar mumbai google

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी बुधवारी अर्ज केला. गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा आज कोल्हापूर पोलिसांना दिला. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सदावर्ते यांना सध्‍या चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहेत. त्यामुळे या प्रकरणात जामीन अर्ज करण्याची मुभा त्यांना मिळाली.

मात्र, मराठा आरक्षणासंबंधित केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर सातारा, कोल्हापूर, अकोला पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल केले आहेत. त्यामुळे जरी ‘सिल्व्हर ओक’ हल्ला प्रकरणात त्यांना जामीन मिळाला तरी अन्य दाखल गुन्ह्यांमुळे त्यांना कारागृहातच राहावे लागेल.

सदावर्ते यांनी घेतलेल्या मालमत्तांची माहिती गावदेवी पोलिस घेत आहेत. यामध्ये परळ आणि अन्य एका ठिकाणी घेतलेली मालमत्ता, आलिशान गाडी, घरात असलेले नोटा मोजण्याचे यंत्र आदींचा उल्लेख विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला.

सदावर्ते यांचा बचाव

  • मी कर्मचाऱ्यांकडून तीनशे ते पाचशे रुपये घेतले होते, ते वकिलीचे शुल्क म्हणून.

  • एखाद्याकडे नोटा मोजण्यासाठी यंत्र असणे यामध्ये गैर काय आहे. हा गुन्हा आहे का?

  • गाडी सेकंडहॅण्ड असून त्याची रितसर नोंदणी केली आहे

  • सदावर्तेंवर अन्य गुन्‍हे मुंबई सत्र न्यायालयात जामिनावर गुरुवारी (ता.२१) न्या. आर. एम. सदरानी यांच्यापुढे सुनावणी होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात सदावर्ते यांना आज सातारा न्यायालयाने जामीन मंजूर एसटी कर्मचारी फसवणूक प्रकरणात सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अकोट न्यायालयात शुक्रवारी (ता. २२) सुनावणी सोलापूरमध्ये सहावा गुन्हा दाखल या प्रकरणात अटकेत असलेल्‍या ११५ कर्मचाऱ्यांच्या जामिनावरही गुरुवारी (ता.२१) सुनावणी होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com