साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह ह. ल. निपुणगे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह, पुष्पक प्रकाशनाचे संचालक ह. ल. निपुणगे (वय 83) यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी लेखिका शीला निपुणगे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह, पुष्पक प्रकाशनाचे संचालक ह. ल. निपुणगे (वय 83) यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी लेखिका शीला निपुणगे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Bigboss 13 : महिराचे चाहते सलमानवर नाराज; #InstandForMahira ट्विटरवर ट्रेंड

ह. ल. निपुणगे हे 1998 ते 2011 या कालावधीत साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहन कोषाध्यक्ष, मसाप पत्रिकेचे माजी संपादक म्हणून काम पाहिले. 1963 ला सुरू केलेल्या पुष्पक प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी 150 पेक्षा जास्त दर्जेदार पुस्तकांची निर्मीती केली. ह. मो. मराठे, आनंद यादव, उद्धव शेळके यांच्या सारख्या ज्येष्ठ साहित्यिकांसह अनेक नवोदित लेखक, लेखिका, कवी यांची पुस्तके प्रकाशित करून त्यांना संधी दिली. 1980 ला "विशाखा' हा दिवाळी अंक काढण्यास सुरूवात केली. त्यामध्ये कविता, कथांसह दरवर्षी एका लेखकावर खास लिखाण केलेले असायचे, तसेच सुखी गृहिणी या शिर्षकाखाली महिलांबद्दल लिखाण केले.

दोवाल यांची धर्मगुरूंशी चर्चा

दिवाळी अंकात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेले साहित्यीक या विषयावरील दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीला उतरले होते शिवाय निपुणगे यांची साहित्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली. यंदाचे "विशाखा' दिवाळी अंकाचे त्यांनी अखेरचे संपादन केले.
 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

निपुणगे यांची शनिवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालवल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: H L Nipunge passes away at 83