दमणगंगेच्या निम्म्या पाण्यावर कागदोपत्री डल्ला 

दमणगंगेच्या निम्म्या पाण्यावर कागदोपत्री डल्ला 

नाशिक : दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पासाठी गृहित धरलेल्या पाण्याच्या जवळपास दुप्पट पाणी दमणगंगा खोऱ्यात उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले असून, एकप्रकारे त्या माध्यमातून मुंबईकरांना पिण्यासाठी प्रस्तावित पाण्याच्या अडीचपट किंवा नाशिकला पाणी पुरविणाऱ्या गंगापूर धरणाच्या दहापट पाणी कागदोपत्री गुजरातकडे पळविण्याचा घाट घालण्यात आला आहे. 

महाराष्ट्र व गुजरात राज्यांदरम्यान प्रस्तावित दमणगंगा-पिंजाळ आणि पार-तापी-नर्मदा हे दोन नदीजोड प्रकल्प गेली चार-पाच वर्षे पाणी पळविण्याच्या मुद्द्यावरून वादात अडकले आहेत. त्यासाठी कारणीभूत मुद्द्यांमध्ये दमणगंगा, तसेच नार, पार, औरंगा, अंबिका या सीमावर्ती नदीखोऱ्यांमध्ये मिळून 133 अब्जघनफूट इतके पाणी उपलब्ध असताना, केंद्रीय जल अयोग आणि नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऍथॉरिटीने (एनडब्ल्यूडीए) दोन्ही नदीजोडमध्ये अनुक्रमे 52 व 31 टीएमसी, असे मिळून 83 टीएमसी पाणी गृहित धरल्याचा मुद्दा प्रमुख आहे.

जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या महाराष्ट्र जलसिंचन आयोगाने दमणगंगा खोऱ्यात 83 टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्‍यातील मधुबन येथे, दमणगंगा व वाघ नद्यांच्या संगमाखाली महाराष्ट्र सीमेला लागून मोठे धरण आहे. 

दमणगंगा खोऱ्याच्या महाराष्ट्रातील पाणलोटात पडलेल्या पावसाचे सगळे पाणी या एकाच धरणात जात असल्याने तेथील आकडेवारी खूप महत्त्वाची मानली जाते. त्या धरणातून वाहून गेलेल्या पाण्याचे माहिती अधिकारात मिळविलेले तपशील आणि केंद्रीय जल आयोगाच्या जलवार्षिकी अहवालाने दमणगंगा खोऱ्यात नदीजोड प्रकल्पासाठी गृहित धरलेल्या पाण्याच्या जवळपास दुप्पट उपलब्धता असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आकडे बोलतात... 

दमणगंगा खोऱ्याचे एकूण पाणलोटक्षेत्र : 2331 चौरस किलोमीटर 

महाराष्ट्रातील पाणलोटक्षेत्र : 1438 चौरस किलोमीटर 

महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणलोटक्षेत्र : 60.74 टक्‍के 

मधुबन धरणातील विसर्गाची दहा वर्षांची सरासरी : 99.8 अब्जघनफूट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com