हंसराज-राजेश्‍वरी "ऍटमगिरी'मध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 मे 2017

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप आणि "फॅन्ड्री फेम' राजेश्‍वरी खरात पहिल्यांदाच "ऍटमगिरी' चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

"ऍटमगिरी' चित्रपटात किशोरवयीन वयातील प्रेमाची कथा आहे. एआरव्ही आणि अविराज प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते विकास मुंदडा, अरविंद चांडक, राहुल बुब, अमित तावरे, प्रदीप बेलदरे, सचिन निगडे, संतोष कदम आहेत. प्रदीप टोणगे आणि मंगेश शेडगे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कार्यकारी निर्माते सचिन दुबाले पाटील, तर प्रसिद्धी प्रमुख रामकुमार शेडगे आहेत.

चित्रपटातील गीतांना रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून, आर्या आंबेकर आणि आदर्श शिंदे यांचा स्वरसाज आहे. चित्रपटात धनश्री मेश्राम, माननी दुर्गे, सूरज टक्के, शशी ठोसर, छाया कदम, अमित तावरे व मिलिंद शिंदे यांच्याही भूमिका आहेत.

Web Title: hansraj-maheshwari in itemgiri movie