हनुमान जन्मस्थळ वादाला पूर्णविराम; अंजनेरीमध्ये ग्रामस्थांचा आनंदोत्सव

हनुमान जन्मस्थळ अंजनेरी असा ठराव घेऊन तो ग्रामसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येईल, असे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.
Hanuman birthplace controversy end Honor of sadhus and mahants Hanuman birthplace is Anjaneri basis of Brahma Purana nashik
Hanuman birthplace controversy end Honor of sadhus and mahants Hanuman birthplace is Anjaneri basis of Brahma Purana nashikesakal

अंजनेरी : हनुमान जन्मस्थळ अंजनेरी की कर्नाटकमधील किष्किंधा या विवादावर आठवडाभरापासून तपोभूमी नाशिकमध्ये खल चालला होता. अखेर अयोध्याच्या राम जन्मभूमीचे प्रमुख आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असल्याचा निर्वाळा ब्रह्म पुराणाच्या आधारे दिला आणि वादावर पडदा पडला. त्याबद्दलचा आनंदोत्सव गुरुवारी अंजनेरीच्या ग्रामस्थांनी साधू-महंतांच्या साक्षीने ढोल-ताशाच्या गजरात साजरा केला. ग्रामस्थांतर्फे विवादामध्ये अंजनेरीची बाजू घेतल्याने साधू-संत-महंतांचा सन्मान करण्यात आला ग्रामसभा घेऊन धर्मध्वज उभारणीचा संकल्प केला जाईल, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.

बेझेमधील (ता.त्र्यंबकेश्‍वर) श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज म्हणाले, की किष्किंधाचे स्वामी गोविंदानंद सरस्वती हे काही तरी उद्देश ठेऊन त्र्यंबकेश्‍वर आणि नाशिकमध्ये आले होते. ते अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ असतानाही किष्किंधा हे जन्मस्थळ असल्याचे सांगून दिशाभूल करत होते.

हनुमान जन्मस्थळ अंजनेरी असा ठराव घेऊन तो ग्रामसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येईल, असे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.

‘सकाळ माध्यम समूहा‘चा गौरव

हनुमान जन्मस्थळ अंजनेरी की किष्किंधा या विवादामध्ये उत्तर मिळण्यासाठीची भूमिका ‘सकाळ माध्यम समूहा‘ने स्वीकारली. त्याबद्दल ग्रामस्थांतर्फे अंजनेरी मंदिराचे महंत अशोकबाबा यांनी ‘सकाळ''च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांचा सत्कार केला.

अंजनेरी हे हनुमान जन्मस्थळ आहे हे सुरवातीपासून मी सांगत होतो. त्यासंबंधीचे पुरावे गडावर पाहावयास मिळतात. तरीही जन्मस्थळाबद्दलचा वाद पेटविण्याचा प्रयत्न केला गेला. अखेर सत्य पुढे आले आहे. त्याचा आनंद अधिक आहे.

- महंत अशोकबाबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com