इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढणारच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

इंदापूर - इंदापूर तालुका हा १९५२ पासून काँग्रेसचा बालेकिल्ला असून, राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढविणार, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनी दिली. 

इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणारच तसेच ही जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही तर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ३०) अंथुर्णे येथील जाहीर सभेत केली. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत यादव बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचा निर्णय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.’’

‘‘आघाडीसाठी होणाऱ्या दोन्ही पक्षांच्या राज्यातील सर्व बैठकांमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून हर्षवर्धन पाटील यांचा सहभाग असल्याने विधानसभेच्या जागेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. दिवंगत खासदार शंकरराव पाटील व आमदार राजेंद्रकुमार घोलप यांनी तालुक्‍यात विकास गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविली आहे. त्यांचाच राजकीय वारसा हर्षवर्धन पाटील पुढे चालवत आहेत,’’ असे ॲड. यादव म्हणाले.  

‘जनता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी’
काँग्रेस व राष्ट्रवादीची २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात आघाडी असताना इंदापूरला राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार उभा करून आघाडीचा शब्द पाळला नाही. याउलट लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रामाणिकपणे प्रचार करून आघाडीचा धर्म पाळून त्यांना विजयी करण्यात मोठा वाटा उचलला आहे. याची जाणीव राष्ट्रवादीने ठेवली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत पाटील यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील, असा विश्‍वास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव यांनी व्यक्त केला.

Web Title: Harshvardhan Patil from Indapur Assembly elections