Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना कोर्टाचा मोठा झटका! अटकेची टांगती तलवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना कोर्टाचा मोठा झटका! अटकेची टांगती तलवार

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कागल येथील साखर कारखाण्यात घोटाळा केल्याचा हसन  मुश्रीफ यांच्यावर आरोप आहे. 

मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्जाच्या निकालापर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण होते. मात्र ते संरक्षण आता संपले आहे. 

साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील व्यावसायिकांवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापेमारी देखील केली होती. ईडीने पुणे शहरातील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. हडपसरला, गणेशपेठ, प्रभात रोड, सिंहगड रोड आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

काय आहे प्रकरण -

नलावडे साखर कारखाना प्रकरणी 11 मार्च रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. मागील दोन महिन्यातील ही तिसरी छापेमारी होती. सकाळी सात वाजता ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.