Hasan Mushrif: मला त्यांनी आता पुन्हा....तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP leader Hasan Mushrif

Hasan Mushrif: मला त्यांनी आता पुन्हा....तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ अखरे काल ईडीसमोर हजर राहिले. यावेळी मुश्रीफांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांनी ईडी कार्यालयाबाहेर पडताच माध्यमांशी संवाद साधला. ईडीच्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊन ईडी चौकशीला सहकार्य केल्याची माहिती यावेळी मुश्रीफांनी दिली.( Hasan mushrif reaction eight hour ed interrogation maharashtra politics )

ईडीने दुपारी साडेबारा वाजता मला समन्स दिले होते. त्यामुळे साडेबारा वाजेपासून ते आतापर्यंत त्यांनी जे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्या सर्वांची उत्तर दिली. मला त्यांनी आता पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. मी काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य केलं. अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.

मुश्रीफांच्या मागण्या ईडीकडून मान्य

हसन मुश्रीफ यांच्या वकिलांच्या माहितीनुसार, मुश्रीफांनी काल ईडी कार्यालयात दाखल होताच चौकशी अधिकाऱ्यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. कायद्याच्या तरतुदीनुसार माझी चौकशी सुरु असताना आपल्या विधानांची ऑडिओ/व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं.

तसेच स्टेटमेंट रेकॉर्ड होत असताना आपले वकील अजित सोनी आणि प्रशांत पाटील यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुश्रीफांकडून करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत काय घडलं?

ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर दोनवेळा धाड टाकलीय. याशिवाय मुश्रीफ यांच्या संबंधित आणखी ठिकाणी छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे ईडीने तीन दिवसांपूर्वी मुश्रीफांच्या घरावर धाड टाकल्यानंतर मुश्रीफ कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले.

या दरम्यान मुश्रीफ नॉट रिचेबल होते. पण त्यांच्या वतीने वकिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली. हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईडीवर आरोप करण्यात आलेले. त्यांच्या याचिकेवर युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने हसन मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून सुरक्षा दिली.

हसन मुश्रीफ यांना पुढचे दोन आठवडे अटक करु नये, असे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर हसन मुश्रीफ आज ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे गेले. त्याआधी काल ते स्वत: ईडी कार्यालयात गेले होते.

पण अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्याला चौकशीसाठी उद्या बोलवू असं सांगितलं होतं. त्यानंतर मुश्रीफांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली. या सगळ्या घडामोडींनंतर ते आज ईडी चौकशीला सामोरे गेले.

टॅग्स :Hasan Mushrif