"त्या' निर्दयी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

मालेगाव : शेतजमिनीचा ताबा जाऊ नये, यासाठी दुसऱ्या गटाने आणलेल्या ट्रॅक्‍टरखाली चक्क जन्मदात्या आईला लोटल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला होता. या घृणास्पद प्रकाराची दखल मालेगाव पोलिसांनी घेतली असून, निर्दयी मुलगा कैलास दळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतःच फिर्याद दाखल केली आहे. 

मालेगाव तालुक्‍यातील मुंगळा येथे केशव माणिकराव व कैलास दळवी यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतीचा वाद होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केशव माणिकराव यांच्यातर्फे महादेव राऊत हे आपल्या साथीदारांसह पेरणीसाठी ट्रॅक्‍टर घेऊन वादग्रस्त शेतात गेले होते. त्या वेळी कैलास दळवी हे वृद्ध आई व पत्नीसह शेतात हजर होते. 

शेतात ट्रॅक्‍टर आल्यानंतर वादविवाद विकोपाला जाऊन शेतातील ट्रॅक्‍टरची पेरणी थांबविण्यासाठी कैलास यांनी चंद्रभागा हरिभाऊ दळवी या जन्मदात्या आईला ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली ढकलले. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित झाली. या घृणास्पद प्रकारानंतर मालेगाव पोलिसांनी मुलगा कैलास दळवी व नातू अंकुश दळवी यांच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अंकुश कैलास दळवी याला अटक केली आहे. 

Web Title: "He filed a complaint against a ruthless child