थंडी व उन्हात जपावे आरोग्याला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

सोलापूर - मकर संक्रांत आली की सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरायणात प्रारंभ करतो. वातावरणात याचे बदल जाणवायला सुरवात होतात. वर्ष अखेरीस गारठून टाकणारी बोचरी थंडी कमी होऊन दुपारी उन्हाचा कडाका तर रात्री गारठा असे संमिश्र वातावरण असते. यामुळे फ्लूसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. 

सोलापूर - मकर संक्रांत आली की सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरायणात प्रारंभ करतो. वातावरणात याचे बदल जाणवायला सुरवात होतात. वर्ष अखेरीस गारठून टाकणारी बोचरी थंडी कमी होऊन दुपारी उन्हाचा कडाका तर रात्री गारठा असे संमिश्र वातावरण असते. यामुळे फ्लूसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. 

ज्या व्यक्तींना मधुमेह रक्तदाब उच्च रक्तदाब आहे. अशा व्यक्तींना स्वाइन फ्लूचा धोका जास्त असतो, त्यामुळे रुग्णांना दिलेली औषधे नियमितपणे घ्यावीत, तसेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. अशा रुग्णांना सर्दी, पडसे सारख्या आजारांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. ज्या रुग्णांना संधिवात किंवा अस्थमा आहे त्यांच्यासाठी थंडीचे दिवस विशेष त्रासदायक असतात. थंडीमुळे हे आजार तीव्र होऊ शकतात. अशा व्यक्तींनी बाहेर जाणे टाळावे किंवा बाहेर जाताना पूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे घालावेत. 

हे करा 
- गर्दीच्या ठिकाणी जाताना नाक व तोंडाला रुमाल बांधावा. 
- उन्हापासून बचावासाठी टोपी व गॉगल यांचा वापर करावा. 
- रात्री पूर्ण बाह्याचे कपडे व स्वेटर वापरावा. 
- दैनंदिन आहार व्यवस्थित करावा. 
- पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, कोमट पाणी पिणे उत्तम. 
- जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. 

हे टाळा ः 
- लहान मुले व गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे. 
- उघड्यावर विकले जाणारे ज्यूस पिणे टाळावे. 
- सर्दी, पडसे झालेल्यांनी बाहेर जाणे टाळावे. 
- शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर करावा. 
- डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविके औषधे घेणे टाळा. 

उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तसेच धुळीचे वाढलेले प्रमाण यामुळे या काळात सर्दी व खोकला या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. याबाबत जागरूक राहिल्यास आजारापासून दूर राहू शकतो. 
- डॉ. अभिजित जगताप, आरोग्य अधिकारी, सोलापूर विद्यापीठ सोलापूर 

Web Title: Health care in summer & winter season