राज्यात १२ हजार कैद्यांची आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पुणे - धर्मादाय आयुक्‍तालयाने कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील सुमारे १२ हजारांहून अधिक कैद्यांच्या आरोग्याची तपासणी केली असून, येरवडा कारागृहातही सोमवारी कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

येरवडा कारागृहात आयोजित कार्यक्रमास प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक, धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे, धर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख, अतिरिक्‍त व जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल पाटील, प्रदीप अष्टूरकर, धर्मादाय उपायुक्‍त नवनाथ जगताप, येरवडा कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, सहधर्मादाय कार्यालयातील रुग्णालय अधीक्षक अभिजित अनाप, निरीक्षक कैलास महाले, डॉ. संजय पठारे, पूनम चौहान, डॉ. वाडीकर उपस्थित होते. मोडक म्हणाले, की कैदी हादेखील समाजाचा घटक असून, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने कैद्यांची आरोग्य तपासणी केली, ही बाब कौतुकास्पद आहे. 

प्राथमिक अवस्थेतील आजार बरे होतील : डिगे
धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे म्हणाले, कैद्यांना अनेक आजार असू शकतात, परंतु माहितीअभावी भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी नियमित आरोग्य तपासणी केल्यास त्यांचे प्राथमिक अवस्थेमधील आजार बरे होतील. यामुळे नियमित आरोग्य तपासणीची गरज आहे.

Web Title: Health check-up of 12 thousand prisoners in the state