हसन मुश्रीफांना धक्का; तिन्ही मुलांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब: Hasan Mushrif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना धक्का; तिन्ही मुलांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना धक्का; तिन्ही मुलांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब

सक्तवसुली संचलनालयाकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार होती मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांची मुलं नाविद, आबिद आणि साजिद यांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. दरम्यान, अर्जावर सुनावणी होत नाही, तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे ईडीच्या वकिलांकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. मुश्रीफ यांच्या मुलांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील बाजू मांडत आहेत.

Hasan Mushrif News: दिल्लीला जावून तक्रार करणारा BJPचा 'तो' नेता कोण? मुश्रीफांनी इशाऱ्यातून सांगितलं नाव

या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता पुढं ढकलण्यात आली आहे. अटकपूर्व जामीनावर आता १० मार्चला सुनावणी होणार आहे.

Hasan Mushrif Ed Raid: राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड; काय आहेत आरोप?

संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी आणि इतर लोकांना भागभांडवल देतो, असं म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी मुश्रीफांविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिलीये.

टॅग्स :Hasan Mushrif