राज्यभरात दोन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - राज्यात उन्हाचा चटका कायम असून, पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. पुण्यात आकाश मुख्यत- निरभ्र राहणार आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमानाचा पारा ब्रम्ह्मपुरी येथे 45.1 अंश सेल्सिअस इतका नोंदला गेला. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. 

उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किनारपट्टीलगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कर्नाटक परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने या भागात ढग गोळा होत आहेत. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर ढग गोळा झाले होते. तसेच लातूर, नांदेड, वाशीम जिल्ह्यातही अंशत- ढगाळ हवामान होते. 

उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे पारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. 

दृष्टिक्षेपात राज्यातील तापमान (अंश सेल्सिअस) 
पुणे 38.4, लोहगाव 39.7, नगर 42.1, जळगाव 42, कोल्हापूर 35.8, महाबळेश्‍वर 32.8, मालेगाव 42.8, नाशिक 37, सांगली 36.3, सातारा 39.6, सोलापूर 41.3, मुंबई 34.5, अलिबाग 35.6, रत्नागिरी 34.3, डहाणू 36.2, औरंगाबाद 40.3, परभणी 43.8, बीड 41, अकोला 43.1, अमरावती 43.6, बुलडाणा 38.5, चंद्रपूर 44.8, गोंदिया 43.5, नागपूर 44.5, वर्धा 44.7, यवतमाळ 43.5. 

Web Title: heat waves in two days in the state