Heatwave to strike mumbai pune nashik in next 48 hours
Heatwave to strike mumbai pune nashik in next 48 hours

मुंबई, पुणे, नाशकात उष्णतेच्या लाटेची शक्यता

येत्या ४८ तासात मुंबई, पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे तापमान 33 किंवा 34 अंशांवर आहे. मात्र काल हा पारा थेट 41 वर पोहचल्याने मुंबईकरांना ऊन्हाच्या तीव्र झळा जाणवल्या. याआधी 2011 मध्ये 17 मार्चला मुंबईचे तापमान 41.3 अंशावर गेले होते. येत्या दोन दिवसात कदाचित हा रेकॉर्डही मोडू शकतो असा अंदाज स्कायमेट वेदरचे व्हॉइस प्रेसिडंट महेश पलावत यांनी नोंदवला आहे.

हवामान खात्याने पुढचे 24 ते 48 तास असेच वातावरण राहिल असा अंदाज वर्तवला आहे. फक्त मुंबईतच नाही तर नाशिक आणि पुण्यातही उष्णतेची लाट जाणवेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडलेली आहे. अशात आता मुंबई, पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये येत्या 48 तासात ऊन्हाचा तडाखा बसणार आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सध्या सर्वसाधारण आहे. तीव्र ऊन अजून या भागांमध्ये जाणवली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये या भागातही ऊन्हाचे चटके जाणवू लागतील असेही स्कायमेटने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com