कोकणात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

पुणे : कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्याच वेळी मुंबईमध्येही काही भागात पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा इशारा देण्यात आला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असली तरीही राधानगरी, कोयना, गगनबावडा, आंबोली येथे पावसाच्या जोरदार सरी बरसतील. पुण्याच्या जवळील पानशेत, वरसगाव, वेल्हा, मावळ, भोर, जुन्नर या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही हवामान खात्याच्या इशाऱ्यात नमूद केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain alert for Konkan by Weather department