महत्त्वाची बातमी : जाणून घ्या, उद्या कोठे कोसळणार मुसळधार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

राज्याच्या अनेक भागात 23 तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण गोव्यासह काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 

पुणे : राज्यात सोमवारी 21 तारखेला सर्वत्र विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. मात्र, या मतदानावर पावसाचं सावट आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या अनेक भागात 23 तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण गोव्यासह काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडतोय, त्यामुळे मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडतोय  राज्यात कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात रविवार पासून बुधवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 

तर मराठवाड्यात ही रविवारी अनेक ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टीचा पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यात सोमवारी आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर 23 आणि 24  तारखेला पाऊस कमी होत जाईल.

तर, विदर्भात रविवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. एकवीस बावीस तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतरही दोन दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने ही राज्याच्या अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

कोकण गोव्यात आणि मध्य महाराष्ट्र रविवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
राज्यात कोकण गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्ये महाराष्ट्रातही शक्यता आहे. मराठवाड्यात दक्षिण भागात रविवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे.

मध्य महाराष्ट्र कोकण आणि घाट भागात तर पाऊस पडतच आहे माञ, घाट परिसरात त्याचबरोबर भूपृष्ठावर काही ठिकाणी अतिवृष्टी चा इशारा आहे. तर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर रात्रीच्या प्रमाणात पाऊस वाढेल. 21 तारखेला दिवसभर पावसाची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दुपारी आणि संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. सकाळच्या सत्रात पाऊस थोडासा कमी राहील मात्र, दुपारच्या नंतर पाऊस चांगला वाढेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain forecast in Maharashtra