कोकणासह दक्षिण महाराष्ट्राला पावसाने झोडपले; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्याचबरोबर कोल्हापूर व घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस झाला. कोल्हापुरात रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले.
Arjuna River
Arjuna RiverSakal

पुणे - कोकणातील (Konkan) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, त्याचबरोबर कोल्हापूर व घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस (Rain) झाला. कोल्हापुरात रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे आज पंचगंगा नदीचे (Panchganga River) पाणी पात्राबाहेर पडले. कोल्हापुरातील (Kolhapur) गगनबावडा येथे सर्वाधिक २८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (Heavy Rain in Konkan and South Maharashtra)

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मागील चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. काही ठिकाणी जवळपास २५० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडत असल्याने ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाचा शिडकावा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Arjuna River
Corona Update : राज्यात दिवसभरात ९,८३० कोरोना रुग्णांची नोंद

पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर - जिल्ह्यात रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३० फूट तीन इंचांवर पोचली. बुधवारी ही पातळी १३ फूट होती. २४ तांसात १७ फुटांनी पाणी पातळी वाढली. पंचगंगेचे पात्राबाहेर पडलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. रात्री नऊच्या सुमारास पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यांवर पाणी आल्यामुळे तो मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. त्यानंतर पाणी पातळी झपाट्याने वाढली. पहाटे चारच्या सुमारास ही पातळी साधारण २१ फुटांपर्यंत पोचली. जिल्ह्यात सकाळी आठपर्यंत सरासरी १०४. ३ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतीवृष्टी नोंदली आहे.

Arjuna River
'दिव्यांगांच्या लसीबाबत तातडीने काय पावले उचलता येतील?'

सांगली जिल्ह्यात रिपरिप

सांगली - जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून पावसामुळे नागरिकांची दैना उडाली आहे. शहरात अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. ओढे-नाले ओसंडून वाहू लागलेत. पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला असून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४५.४ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९७.१ मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी पहाटेपासून थोड्या विश्रांतीच्या अंतराने दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच आहे. २४ तासात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढत आहे. वारणा धरणात आज १५.१२ टीएमसी पाणीसाठा आहे.

सिंधुदुर्गात जोर ओसरला

वैभववाडी - जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारपावसाचा जोर आज ओसरला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत घट होत असून संभाव्य पुराचा धोका टळला आहे. जनजीवनही काही अंशी पुर्वपदावर आले आहे. जिल्ह्याला सलग पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. बांदा (ता. सावंतवाडी) शहर जलमय झाले होते.

Arjuna River
मराठा आरक्षण: आंदोलन मागे घेणार नाही; सरकारशी चर्चा सुरुच राहिल

चिपळुणात पूरस्थिती

रत्नागिरी - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने जिल्ह्याला झोडपले. पावसामुळे राजापुरात पूर आला. तर चिपळूण, खेड तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती.

जिल्ह्यात मागील चोवीस सरासरी 83.44 मिमी पाऊस झाला. त्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद खेड येथे १६५ मिमी इतकी झाली. त्याच्यापाठोपाठ संगमेश्‍वर येथे १०९.२० मिमी पाऊस पडला. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आला होता. मध्यरात्री तीनच्या सुमारास बाजारपेठेत पाणी शिरले.

मराठवाड्यात जोरदार सरी

औरंगाबाद - मराठवाड्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असून आजही काही भागात जोरदार सरी कोसळल्या. जालना शहरात दहा दिवसांनंतर सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील नाले तुंबले आणि पाणी रस्त्यावर आले. जिल्ह्याच्या अन्य भागात हलका पाऊस झाला. औरंगाबाद शहरात दुपारी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अर्धातास पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी पहाटे तर परभणी शहरात दुपारी पावसाने हजेरी लावली. कालही या जिल्ह्यात पाऊस झाला. २४ तासांत सरासरी १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला. दरम्यान, आज सकाळी आठला झालेल्या नोंदीनुसार गत २४ तासांत सरासरी ७.२ मिलिमीटर पाऊस झाला. लातुर जिल्ह्यात रिमझिम ते दमदार पाऊस झाला.

पश्‍चिम विदर्भात प्रतीक्षा

पूर्व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. मात्र पश्‍चिम विदर्भात जोरदार पाऊस झालेला नाही. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com