पावसाने मध्य महाराष्ट्रातील सरासरी ओलांडली

Rain
Rain

पुणे - पुणे आणि परिसरात सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे परतीच्या पावसाने गेल्या ११ दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सरासरी ओलांडली. तर, कोकणात आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात सरासरी गाठली आहे. विदर्भात मात्र परतीच्या पावसाने दडी मारल्याचे हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

देशातून गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. जम्मू, काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेशच्या संपूर्ण भागातून मॉन्सून परतला. बिहार, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागातून त्याने परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्रातूनही पुढील चार ते पाच दिवसांमध्ये परतीचा पाऊस पुढे जाईल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

राज्याच्या बहुतांश भागात परतीचा पाऊस पडत नाही. एक ते ११ ऑक्‍टोबर दरम्यान सरासरी ४२.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ५७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ३६ टक्के जास्त पाऊस पडला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये या वर्षी पावसाळ्यात काठावर हजेरी लावली. पण, परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे.

ऑक्‍टोबरच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये तेथे ३६.६ मिलिमीटर (सरासरी ३९.२ मि.मी.) पावसाची नोंद झाली. विदर्भात मात्र जेमतेम ७.५ मिलिमीटर पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरात सातत्याने पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील पावसाची सरासरी भरून आल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.  मात्र, राज्यात एक ते ११ ऑक्‍टोबर दरम्यान सरासरी ४२.२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ३७.५ मिलिमीटर म्हणजे सरासरीपेक्षा ९ टक्‍क्‍यांनी पाऊस कमी पडला.

शहरात जोर कमी होणार
शहर व परिसरात पावसाचा जोर कोजागरी पौर्णिमेनंतर (ता. १३) कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

ढगांच्या गडगटासह परिसरात शनिवार (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) पाऊस पडेल. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पाऊस पडण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता असल्याचेही खात्याने सांगितले आहे. सोमवारी (ता. १३) आकाश ढगाळ राहणार असून हलक्‍या सरी पडतील. त्यानंतर पाऊस पडण्याची शक्‍यता नाही. आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर कमाल तापमानाचा पारा वाढेल.

शहरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरीही पावसाने हजेरी लावली नाही. हवेत ८० टक्‍क्‍यांहून जास्त आर्द्रता होती. त्यामुळे दुपारनंतर पावसाची शक्‍यता व्यक्त करण्यात आले होती. मात्र, संध्याकाळपर्यंत पाऊस पडला नाही. केवळ सिंहगड आणि पाषाण या भागांत हलक्‍या सरी पडल्या. 

पाषाणमध्ये ५५ मिलिमीटर पाऊस
शिवाजीनगर येथील वेधशाळेत गेल्या चोवीस तासांमध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाषाण येथे पावसाचा सर्वाधिक जोर होता. तेथे ५५ मिलिमीटर, तर लोहगाव येथे ८.४ मिलिमीटरची पाऊस पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com