सावधान! पुढच्या २४ तासात दमदार बरसणार; मुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता.. 

अथर्व महांकाळ
रविवार, 12 जुलै 2020

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं खरं मात्र जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र आता जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई:  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं खरं मात्र जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र आता जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे. तर पुढच्या २४ तासांमध्ये मुंबईसह राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

हेही वाचा: ठाकरे सरकारमधल्या मंत्र्याला फडणवीस म्हणाले 'नया है वह'...

गेल्या आठवड्यात मुंबईत पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं त्यांनतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात कोल्हापूर, पुणे, सातारा आणि कोकण या भागांमध्ये पुढच्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान मुंबई, कोकण किनारपट्टी, नवी मुंबई, पुणे या भागांमध्ये काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. कोकणात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे नद्या, कालवे दुथडी भरून वाहत आहेत. तर खडकवासला धरण भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. 

हेही वाचा: धारावीच्या यशावर मुख्यमंत्री काय म्हणाले... 'या' शब्दात व्यक्त केल्या भावना

कुलाबा वेधशाळेनं मुंबई, नवी मुंबई, कोकण, पुणे ,सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये पुढच्या २४ तासांमध्ये पुन्हा पाऊस येणार असा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येतंय.    

heavy rain in next 24 hours in maharashtra 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in next 24 hours in maharashtra