राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

विंग (जि. सातारा) - जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस विश्रांती घेत पडत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान सुरू आहे. बुधवारी सायंकाळी येथे झालेल्या पावसामुळे ऊसपीक जमीनदोस्त झाले.
विंग (जि. सातारा) - जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस विश्रांती घेत पडत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान सुरू आहे. बुधवारी सायंकाळी येथे झालेल्या पावसामुळे ऊसपीक जमीनदोस्त झाले.

पुणे - परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुणे शहराला बुधावारी (ता. ९) वादळी वाऱ्यांसह पावासाने अक्षरश झोडपून काढले. तर सोलापूर जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

ऑक्टोबर हीट वाढल्याने वातावरणात सकाळपासून उकाड्यात वाढ होत आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हवामान ढगाळ होते. बुधवारी (ता. ९) सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर अचानक ढग जमा झाल्याने दुपारी पाचनंतर राज्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडला असून, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी मात्र पावसाची उघडीप होती.

पावसाने दिलेली उघडीप आणि वाढलेला उन्हाच्या चटक्यामुळे वातावरणात उकाड्यात वाढ झाल्याने अनेक भागांतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर डहाणू, सातारा  येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात घट झाली असून, जळगाव, मालेगाव, अलिबाग, औरंगाबाद, बीड, गोंदिया, वर्धा येथील कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com