बंगाल अन् गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

बंगाल अन् गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र (low pressure area in bay of bengal) अजून तीव्र झाले आहे. तसेच गुजरात येथे कमी दाबाचे क्षेत्र आहे. याचा संयुक्त परिणाम म्हणून राज्यात आज मुसळधार पावसाची (maharashtra weather forecast) शक्यता आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर आणि विदर्भातही अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा: पुणेकरांनो, पुढील काही दिवसांत असा पडणार आहे पाऊस!

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. रविवारी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. आता गुजरातमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावासाचा जोर वाढण्याची शक्यता बळावली आहे. कोकण आणि मुंबईवर सर्वाधिक परिणाम होईल. त्यामुळे अलर्ट देखील जारी करण्यात आले आहे. कोकणात ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

बुधवारपासून पावसाचा जोर होणार कमी -

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, सोमवारी १३ सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. दरम्यान, १४ सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. त्यानंतर बुधवारपासून पावासाचा जोर कमी होणार आहे.

Web Title: Heavy Rain Warning In Next Two Days In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..