राज्यात पावसाची दमदार बॅटींग’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

देशात यंदा बरोबर 1 जूनला केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात 11 जूनला पोचला. निसर्ग चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या महाराष्ट्रापर्यंतच्या वाटचाला वेग मिळाला. त्याने 26 जूनपर्यंत यंदा संपूर्ण भारत व्यापला होता. राज्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये अकोला, अमरावती आणि यवतमाळ वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

पुणे : राज्यात यंदा मुंबई, मुंबईतील उपनगरांसह नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सर्वाधिक सरी पडल्या. या भागात पावसाची सरासरीपेक्षा खूप जास्त नोंद झाली. मात्र, विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

No photo description available.

देशात यंदा बरोबर 1 जूनला केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात 11 जूनला पोचला. निसर्ग चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या महाराष्ट्रापर्यंतच्या वाटचाला वेग मिळाला. त्याने 26 जूनपर्यंत यंदा संपूर्ण भारत व्यापला होता. राज्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये अकोला, अमरावती आणि यवतमाळ वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

ऑगस्टने महाराष्ट्राला तारले
महाराष्ट्रात सुरवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावणाऱया पावसाने जुलैमध्ये दडी मारली. मात्र, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने महाराष्ट्राला पाण्याच्या संकटातून बाहेर काढले. 1 जून ते 31 जुलैपर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत जेमतेम पाच टक्के पावसाची नोंद झाली होती. राज्यात 1 जून ते 30 ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस पडला. राज्यात 1 जून ते 30 ऑगस्ट दरम्यान 816.2 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात 956.1 मिलीमीटर (17 टक्के) पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. 

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

मॉन्सूनची मराठवाड्याला झुकते माप
दुष्काळी भाग समजल्या जाणाऱया मराठवाड्यातील जिल्ह्यांवर यंदा मॉन्सून मराठवाड्याला झुकते माप दिले. तेथील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस यंदा औरंगाबाद जिल्ह्यात झाला. औरंगाबादमध्ये पावसाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 405.1 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा 739.6 मिलीमीटर (सरासरीच्या तुलनेत 83 टक्के जास्त) पावसाची नोंद झाली. 

पुण्यात 40 टक्के जास्त पाऊस
पुण्यात पावसाळ्यातील तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 40 जास्त पाऊस पडला. यंदा जूनमध्ये पुण्यात पावसाने सरासरी ओलांडली होती. पण, जुलैमध्ये मोठा ‘ब्रेक’ घेतला होता. मात्र, ऑगस्टमध्ये दमदार सरी पडल्या. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत 40 टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात तीन महिन्यांमध्ये सरासरी 681.6 मिलीमीटर पाऊस पडत. यंदा 957.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

सरसरीपेक्षा 60 टक्के जास्त पाऊस पडलेले जिल्हे

Image may contain: text that says "सकाळ सरसरीपेक्षा 60 टक्के जास्त पाऊस पडलेले जिल्हे मुंबई मुंबई उपनगर नगर औरंगाबाद 63 63 89 83"

पावसाची सरासरी ओलांडलेले जिल्हे (20 ते 59 टक्के)
Image may contain: text that says "27 सकाळ पावसाची सरासरी ओलांडलेले जिल्हे (20 ते 59 टक्के) रत्नागिरी सिंधुदूर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे बीड जालना 44 22 30 55 40 55 46 जळगाव धुळे 27 53"
 

नारायणगावकरांनो जरा जपून, परिसरात होतेय जोरदार कारवाई... 

पावसाची जेमतेम सरासरी गाठलेले जिल्हे (उणे 19 ते 19 टक्के)

Image may contain: text that says "8 सकाळ पावसाची जेमतेम सरासरी गाठलेले जिल्हे (उणे 19 ते 19 टक्के) सातारा 7 बुलडाणा रायगड नांदेड ठाणे वाशिम पालघर हिंगोली नाशिक परभणी नंदूरबार लातूर नागपूर उस्मानाबाद 3 14 15 15 14 17 10 1 11 5 5 16 18 वर्धा गोंदिया गडचीरोली चंद्रपूर 6 भंडारा सरासरीपेक्षा 10 टक्के कमी पाऊस सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पाऊस सरासरीपेक्षा 6 टक्के कमी पाऊस सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पाऊस"

सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे (उणे 59 ते उणे 20)

Image may contain: text that says "सकाळ सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे (उणे 59 ते उणे 20) अकोला अमरावती सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस सरासरीपेक्षा 21 टक्के कमी पाऊस सरासरीपेक्षा 25 टक्के कमी पाऊस यवतमाळ"
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rainfall in the Maharashtra