पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा 

योगिराज प्रभुणे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

पुणे : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर या दोन्ही भागातील मॉन्सूनची शाखा एकाच वेळी सक्रिय झाल्याने मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी दिली. 

डॉ. कश्‍यपी म्हणाले, "मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी संध्याकाळपासून पुढील दोन दिवस पावसाची जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, राधानगरी, गगनबावडा, कोयना, ताम्हिणी, माळशेज अशा घाटमाथ्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. '' 

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा इशारा फक्त घाटमाथ्यापुरताच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
नाशिकमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains on the hilltop of Pune, Satara, Kolhapur