
High Security Number Plate : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काय असते ?जाणून घ्या कुठे करावी खरेदी
High Security Number Plate Online Apply : तुम्ही तुमच्या वाहनावर अजून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नसेल, तर लवकरात लवकर लावून घ्या. नाहीतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. खरं तर कार-बाइकवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. जर कोणी या नियमांचं उल्लंघन करत असेल तर वाहतूक पोलिस अनेक हजार रुपयांचा दंड ठोठावतात.
परिवहन विभागाने 31 मार्च 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) लावणं बंधनकारक केलं आहे. तुमच्याकडे अशी जुनी कार-बाईक किंवा अन्य वाहन असल्यास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावावी लागेल. जर कोणी हा नियम पाळला नाही तर त्याला 5000 रुपये दंड ठोठावला जाईल.
ही प्लेट खरेदी कशी कराल?
तर गाडीचा मालक अधिकृत वेबसाइट (www.bookmyhsrp.com) वर भेट देऊन हाय सिक्युरिटी प्लेट खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकतात. येथे वाहनधारकाला चारचाकीसाठी 500-1000 रुपये मोजावे लागतात, तर दुचाकीसाठी 300-400 रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय जर तुम्हाला हाय-सिक्युरिटी नंबर प्लेटची होम डिलिव्हरी हवी असेल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
पण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय?
तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. ही प्लेट HSRP होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर वाहनाचे इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिला जातो. नंबर प्लेटला वाहनावर बसविण्यासाठी पिन असते. जेव्हा या पिन वाहनाला जोडल्या जातात तेव्हा त्या दोन्ही बाजूंनी बंद केल्या जातात.