राज्य उन्हाने होरपळले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍याने होरपळत असून 16 शहरांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने रविवारी चाळिशी ओलांडली. आगामी दोन दिवस राज्यात हवामान कोरडे राहील. पुण्यात 39.5 अंश सेल्सिअसवर पोचलेला कमाल तापमानाचा पारा पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 42.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

पुणे - महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍याने होरपळत असून 16 शहरांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने रविवारी चाळिशी ओलांडली. आगामी दोन दिवस राज्यात हवामान कोरडे राहील. पुण्यात 39.5 अंश सेल्सिअसवर पोचलेला कमाल तापमानाचा पारा पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 42.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेला आहे. राजस्थानातही उन्हाचा तडाखा वाढला असून तेथून महाराष्ट्राच्या दिशेने उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान वाढले आहे, अशी माहिती पुण्यातील हवामान खात्याने दिली आहे. 

पुण्याचा पारा वाढणार 
अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्याच्या काही भागात आकाश अंशतः ढगाळ झाले होते. त्याचा परिणाम पुण्याच्या वातावरणावरही झाला. त्यामुळे या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा 40 वरून 35 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने शहर आणि परिसरातील तापमान पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमान 39.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरी तापमान हे 2.2 अंश सेल्सिअसने वाढले. किमान तापमान 0.6 अंश सेल्सिअसने कमी होऊन ते 18.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. येत्या मंगळवारपासून (ता. 11) आकाश निरभ्र राहणार असल्याने कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल आणि गुरुवारपर्यंत (ता. 13) ही स्थिती कायम राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

विदर्भ, मराठवाडा होरपळला 
ओरिसाच्या काही भागात उष्णतेची लाट आहे. तेथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली. त्याच्या जवळ असलेला विदर्भ आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग उन्हाच्या चटक्‍यांनी होरपळत आहे. तेलंगण, गुजरात, उत्तर कर्नाटक येथील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले जात आहे. 

शहर ....... कमाल ........ किमान (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात सरासरीपेक्षा वाढलेले तापमान) 
पुणे ....... 39.5 ( 2.2) ....... 18.1 (-0.6) 
लोहगाव ....... 40.3 ( 2.3) ....... 20.1 ( 0.1) 
जळगाव ....... 38.0 (-2.6) ....... 18.0 (-4.7) 
कोल्हापूर ....... 39.4 (2.3) ....... 24.4 ( 2.8) 
महाबळेश्‍वर ....... 35.8 (4.1) ....... 21.0 ( 2.3) 
नाशिक ....... 39.2 (1.9) ....... 16.1 (-2.5) 
सांगली ....... 40.3 ( 2.1) ....... 23.3 ( 2.2) 
सातारा ....... 39.6 ( 3.1) ....... 20.4 (-0.5) 
सोलापूर ....... 42.0 ( 2.5) ....... 24.3 ( 0.2) 

मुंबई ....... 34.0 ( 1.7) ....... 26.5 ( 2.0) 
सांताक्रूझ ....... 35.8 ( 2.6) ....... 20.4 (-3.1) 
अलिबाग ....... 32.8 ( 1.1) ....... 22.9 (-0.3) 
रत्नागिरी ....... 33.4( 1.3) ....... 21.7(-2.6) 
पणजी....... 33.0( 0.1) ....... 24.0(-1.1) 
डहाणू ....... 33.2( 0.8) ....... 24.0( 0.6) 
उस्मानाबाद ....... 40.6( 3.0) ....... 20.0(-2.4) 
औरंगाबाद....... 40.2( 2.3) ....... 22.1( 1.1) 
परभणी ....... 41.5( 1.7) ....... 22.1(-1.3) 
नांदेड ....... 42.6( 2.6) ....... 22.0( 0.3) 
अकोला ....... 42.4 ( 2.4) ....... 21.4 (-2.4) 
अमरावती ....... 40.6( 0.3) ....... 23.4(-0.3) 
बुलडाणा....... 39.4( 2.8) ....... 23.4(-0.2) 
ब्रह्मपुरी ....... 42.5( 3.1) ....... 24.2( 0.9) 
चंद्रपूर ....... 42.8( 2.4) ....... 24.0( 0.0) 
गोंदिया ....... 41.5( 2.3) ....... 22.0(-2.0) 
नागपूर ....... 41.6( 2.1) ....... 24.1( 1.2) 
वर्धा ....... 42.0( 1.9) ....... 25.1( 1.5) 
यवतमाळ....... 41.0( 1.6) ....... 22.4(-1.7) 

Web Title: High temperature in maharashtra