नाशिकमध्ये विक्रमी मतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज काही अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. मात्र, मुंबई पदवीधर मतदारसंघात जेमतेम 53.23 टक्‍के मतदान झाल्याने पदवीधरांना पावसाने घरातच रोखल्याचे स्पष्ट झाले आहे; तर नाशिक शिक्षक मतदारसंघात विक्रमी असे 92.30 टक्‍के मतदान झाले. 

आज मुंबई पदवीधर व शिक्षक तर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघात मतदान पार पडले. नाशिक शिक्षकसाठी शिवसेना, भाजप व कॉंग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत शिक्षक आघाडीच्या उमेदवारांत सामना आहे. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि सध्या भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आणि शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात सामना झाला. या मतदारसंघात सरसरी 73.89 टक्‍के मतदान झाले आहे. मुंबई पदवीधरमध्ये भाजप व शिवसेनेत सरळ लढत असल्याचे चित्र होते. मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. 

मतदानाची टक्‍केवारी 
नाशिक शिक्षक- 92.30 
मुंबई शिक्षक- 83.26 
मुंबई पदावीधर- 53.23 
कोकण पदवीधर- 73.89 

Web Title: High Voting in nashik for the Legislative Council graduate and teacher constituency