महामार्गांवरील दारू दुकाने हटणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतराच्या आत असलेले बियर बार व दारूची दुकाने मोजण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच ही सर्व दुकाने हटवली जाणार आहेत. तसेच या पुढे महामार्गावर पाचशे मीटरच्या आत बियर अथवा दारूच्या दुकानाला परवानगी दिली जाणार नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचा निवाडा देताना महामार्गावर पाचशे मीटर अंतरावरील सर्व दारू दुकाने हटवावीत असे म्हटले आहे, तसेच या पुढे कोणत्याही परिस्थितीत अशा दुकानांना परवानगी देऊ नये असे म्हटले होते. याला अनुसरून राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 27 जानेवारी 2017 एक बैठक घेतली. या बैठकीत महामार्गावरील अशा दुकानांची मोजणी करून पुढील कारवाई करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत महामार्गावर पाचशे मीटरच्या आत बार अदवा दारू विक्री परवानगी देऊ नये, असे धोरण उत्पादनशुल्क खात्याने निश्‍चित केले आहे. 

Web Title: Highway liquor stores