श्रीराम सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते रवी कोकितकर यांच्यावर आज्ञातांकडून गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

श्रीराम सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते रवी कोकितकर यांच्यावर आज्ञातांकडून गोळीबार

रामसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवी कोकीतकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना हिंडलगा येथे घडली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी कार मधून जात असलेल्या रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केला. रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांना उपचारासाठी के एल ई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवी कोकीतकर यांचा चालकही गोळीबारात जखमी झाला आहे.

ते कामासाठी जात असतानाच स्पीड ब्रेकरवर गाडीचा स्पीड कमी केला असता. जवळच थांबलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रवी कोकीतकर यांच्यासह त्यांचा चालकही यामध्ये जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांच्या वाहनचालकालाही दुखापत झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केले आहे. दरम्यान घटना स्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून गोळीबार कुणी केला का केला आणि कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा: आजारपण खोटं, CM पदासाठी उद्धव यांना आजारी पाडलं; रश्मी ठाकरेंवर मनसेची टीका

टॅग्स :crimeaccident