हिंदू अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - पाकिस्तान व बांगलादेशातून भारतात आलेल्या आठ हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना आज गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. 2016 मध्ये घेतलेल्या या निर्णयानुसार अशा लोकांना भारताच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले होते. या निर्णयानुसार जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.
- रणजित पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे)

Web Title: hindu Minority Citizenship of India