हिंदुत्ववादी संघटनेचा भररस्त्यात नंग्या तलवारीचा नाच; व्हिडिओ व्हायरल

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात गाण्याच्या तालावर नंग्या तलवारी नाचविल्या.
हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात गाण्याच्या तालावर नंग्या तलवारी नाचविल्या.sakal

बेळगाव : खंडे नवमी निमित्त एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात गाण्याच्या तालावर नंग्या तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मच्छे क्रॉसनजीकच्या ब्रह्मलिंगनगर येथील हनुमान मंदिरजवळ कार्यकर्त्यांनी तलवारी, जांबिया, मुष्ठी हातात घेऊन नसतानाचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याकडे पोलिसांनी मात्र, डोळेझाक केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खंडे नवमी दिवशी पारंपारिक पद्धतीने शस्त्र पूजा केली जाते. पण, एका हिंदुत्ववादी संघटनेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आगळीक करत चक्क नंग्या तलवारी नाचवल्या आहेत. मच्छे क्रॉस येथील रामनगर हनुमान मंदिर येथे पूजा करून कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावरच गाण्याच्या तालावर ठेका धरला. यावेळी तलवारी, मुष्ठी जांबिया हातात घेऊन मुख्य रस्त्यावरच धिंगाणा घालण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. पिरणवाडी, खादरवाडी,मच्छे हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. मात्र, मुख्य रस्त्यावरच अशाप्रकारे शस्त्रे नाचविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरवी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करणाऱ्या पोलिसांनी या प्रकाराकडे डोळेझाक केली असल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खंडे नवमी दिवशी घडलेल्या या प्रकाराबद्दल कल्पना असून याबाबत माहिती घेतली जाईल. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

डॉ. के. त्यागराजन, पोलीस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com