Ahmednagar: मुस्लिम तरुणीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, घातपाताचा संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar: मुस्लिम तरुणीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, घातपाताचा संशय

Ahmednagar: मुस्लिम तरुणीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, घातपाताचा संशय

लव्ह जिहादवरून चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एका आंतरधर्मिय लग्नाला हिंदू संघटनांनी विरोध करुन लव्ह जिहाद चालु असल्याचा आरोप केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर आता श्रीरामपूरमधुन आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिन्यापूर्वी मुस्लिम मुलीशी लग्न झालेला तरुण अचानक बेपत्ता झाला असून त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तर कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून बेपत्ता असलेल्या तरुणाची शोधमोहिम सुरु केली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकरमधील दीपक बर्डे या तरुणाचे शहरातील एका मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या या नात्याला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता. तरीदेखील दोघांनीही घरच्यांचा विरोध पत्करुन महिनाभरापूर्वी लग्न केलं. विवाह करून मुलीला घरी आणल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी दीपकला मारहाण करुन मुलीला घरी घेऊन गेले होते.

हेही वाचा: लव्ह जिहादवरुन खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये खडाजंगी

मुलगी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचे समजताच दीपकने नोकरी शोधण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून पुणे गाठलं. पुण्याला जातो असं सांगुन बाहेर पडलेला तो अद्याप घरी परतलेला नाही. त्यामुळे आता त्याच्या घरच्यांच्या चिंता वाढल्या असून त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. याशिवाय दीपक कुठे गेला, त्याच्यासोबत काय झालं, आता तो कुठे आहे?, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

दीपकच्या वडिलांना त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही तातडीने कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे.

Web Title: Hindu Youth Who Married A Muslim Girl Suddenly Goes Missing In Shrirampur Ahmadnagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..