Crime News : रुजू व्हायला गेल्यावर कळले भरतीच नाही; नोकरीच्या आमिषाने ३४ लाखांचा गंडा

Crime
Crimeesakal

हिंगोली : कृषी विभागात नोकरीचे बनावट आदेश देऊन ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २३) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

Crime
Crime : दांपत्याने गळफास घेऊन जीवन संपवलं; काही महिन्यांपूर्वीच केला होता आंतरजातीय विवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील सचिन मधुकर चेके (रा. मंगरूळपीर, जि. वाशीम), अरुण श्रीराम ठाकरे (रा. इरळा, ता. मालेगाव), गोवर्धन गावंडे (रा. कनेरगाव, ता. हिंगोली) यांनी हिंगोलीच्या अंतुलेनगर भागातील गजानन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. राज्याच्या कृषी विभागात तुमच्या नातेवाइकांना नोकरी लावतो, असे आमिष दाखविले.

त्यांच्या विश्वास बसावा यासाठी त्यांनी काही जणांना नोकरी लावल्याचे दाखवून नोकरी लावण्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. गायकवाड यांनी त्यांच्या पुतणीसाठी २१ लाख रुपये तर नातेवाईकाच्या पत्नीला नोकरीसाठी १३ लाख रुपये असे ३४ लाख रुपये एक एप्रिल ते नऊ जून २०२१ या कालावधीत दिले. पैसे मिळाल्यानंतर काही दिवसांतच तुमचे काम होईल, असे संबंधितांनी सांगितले.

Crime
Accident : काकांच्या अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला! 'समृद्धी'वर चौघा भावांचा मृत्यू

काही दिवसांतच हिंगोलीच्या जिल्हा अधिक्षक कृषी विभागात कामावर रुजू होण्याचे आदेश त्यांच्या हाती दिले. त्यानुसार गायकवाड यांचे नातेवाईक रुजू होण्यासाठी गेले असता अशा प्रकारची कुठलीही भरती झालेली नाही, भरतीबाबत जाहिरातही काढलेली नाही असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी पैसे परत देण्याची मागणी संबंधितांकडे केली. मात्र तिघांकडून टाळाटाळ सुरू झाली.

तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा

गायकवाड यांनी मंगळवारी रात्री हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सचिन चेके, अरुण ठाकरे, गोवर्धन गावंडे या संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक मुपडे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com