देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस: आदित्य ठाकरे

Historic day for India Says Aditya Thackeray
Historic day for India Says Aditya Thackeray

नवी दिल्ली: देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 370 कलम हटविल्यामुळे जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभे राहू शकेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (सोमवार) ट्विटरवरून व्यक्त केला आहे.

भाजप सरकारने आज राज्य सभेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ट्विटर द्वारे या निर्णयाचं समर्थन केले.

भारताच्या इतिहासात हा ऐतिहासीक निर्णय आहे. कलम 370 हटवल्याने जम्मू आणि काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग झाले आहेत. यामुळे आता खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरचा विकास होईल अशी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना भवन बाहेर शिवसैनीकांनी ढोल, ताशा, नगाडे वाजवून जल्लोष केला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून निर्णयाच स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'एनडीएसाठी अभिमानास्पद असा हा क्षण आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसद आणि जनतेचे अभिनंदन करतो. यासाठीच आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वात एनडीएला पाठिंबा दिला होता. जम्मू-काश्मीर आणि लडाख नव्या उभारणीसाठी मी प्रार्थना करतो. त्या राज्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. राज्यात शांतता, प्रगती आणि भरभराट होईल. वर्षोनुवर्षे रखडलेला प्रश्न सुटला आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com