esakal | मुंबईसह कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुटी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईसह कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुटी

गेल्या काही दिवासांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण विभाग आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

मुंबईसह कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवासांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण विभाग आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
 


आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता मुंबईसह काही भागात जोरदार पाऊस आहे. त्यांमुळे उद्या (ता.05 सप्टेंबर) सुटी जाहीर करण्यात येत आहे.


उद्या मुंबई, कोकण विभाग आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील अन्य भागातील पावसाच्या परिस्थितीचा स्थानिक पातळीवर अंदाज घेऊन जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेण्याचे आदेशही आशिष शेलार यांनी दिले आहेत.

loading image
go to top