घरकामांत स्त्री-पुरुष समानता हवी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची? आजच्या काळात पुरुषांनीही ही कामे करायला हवीत, असे मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले. 

घरामध्ये आजारी असलेल्या आईच्या देखभालीसाठी विवाहित बहिणीने घरी येऊन काम करावे, अशी मागणी करणारी याचिका दोन भावांनी न्यायालयात केली होती. याचिकादार अविवाहित आहेत. या याचिकेवर न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. आम्ही दोघेही नोकरी करतो आणि आईची देखभालही करतो. मात्र, आई आजारी असते; पण बहीण तिची कर्तव्ये टाळते. आईच्या देखभालीसाठी बहिणीने किमान एक तास रोज घरी येऊन आईशी संबंधित कामे करावीत, अशी मागणी याचिकेत केली होती. तसेच, घरामध्ये निर्माण झालेली परिस्थिती खेदजनक आहे, असेही भावांच्या वतीने सांगण्यात आले होते. न्यायालयाने या मागणीबाबत तीव्र असमाधान व्यक्त केले. याचिकादारांना बहीणच नसती तर त्यांनी काय केले असते; मग तुमच्या घरी येऊन कोणी काम केले असते, असा प्रतिसवाल न्यायालयाने उपस्थित केला. तुम्ही स्वतःच घरातील कामे का करीत नाहीत, किंवा मग दुसऱ्या कुणाला तरी कामावर का ठेवत नाही, असेही न्यायालयाने विचारले. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला असून, पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 

Web Title: Homework Equality says high court