Waghnakh : शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं युकेला कशी गेली? जाणून घ्या इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How Waghnakh used by Chhatrapati Shivaji Maharaj to kill afzal khan reached UK

Waghnakh : शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं युकेला कशी गेली? जाणून घ्या इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला, तेव्हा त्यांनी वापरलेली वाघनखं ही सध्या ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. हा भारताचा अनमोल ठेवा परत आणण्याची मागणी मागील बऱ्याच दिवसांपासून होत आहे. यादरम्यान आता राज्य सरकार शिवरायांची ती वाघनखं लवकरचं भारतात परत घेऊन येणार आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि कार्य मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी जाहीर केले आहे की, ब्रिटनने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं, ज्याचा वापर अफझलखानाला मारण्यासाठी केला होता, ती भारताला सुपुर्द करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच ही वाघनखे महाराष्ट्रात परत येण्याची शक्यता आहे. मात्र ही वाघनखं ब्रिटनमध्ये कशी पोहचली? यामागे एक वेगळाच इतिहास आहे.

छत्रपती शिवरायांनी वापरलेलं हे वाघनखे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साताऱ्यातील वंशजांकडे होती. १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांची निवासी अधिकारी (राजकीय हस्तक) म्हणून नेमणूक सातारा येथे होती. तेव्हा पेशव्यांकडून ही वाघनखं जेम्स ग्रँट डफ या ब्रिटीश अधिकाऱ्याला देण्यात आली.

दरम्यान डफ यांनी सातारा येथे १८१८ ते १८२४ या काळात काम केलं. त्यानंतर ते ही वाघनखं ब्रिटनला सोबत घेऊन गेले. त्यानंतर पुढे या ब्रिटीश अधिकाऱ्याच्या वंशजाकडून शिवरायांची ही वाघनखे युकेमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्राहलयाला देण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

आनंदाची बाब म्हणजे महाराजांची ही वाघनखं राज्यात परत आणण्यासाठी आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ब्रिटनला जाणार आहेत. महाराष्ट्राचा अनमोल ठेवा शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी स्वतंत्र जीआर काढण्यात आला आहे. मंत्री मुनगंटीवार आणि खात्याचे प्रमुख सचिव विकास खरगे हे दोघे २९ सप्टेंबरला लंडनला जाणार असून वाघनखं आणण्यासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.(Latest Marathi News)