एकत्र येऊन काम केल्यास नक्कीच बदल - अभिजित पवार

हॉटेल नोवोटेल - ‘सकाळ’ आणि ‘एचआर इंटरॅक्‍ट’ यांच्या वतीने ‘एचआर मीट’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी (डावीकडून) जशन जोशी, दिनेश गुप्ता, सुदेश वर्मा, अभिजित पवार, सुनील काशीकर, पराग मेहता.
हॉटेल नोवोटेल - ‘सकाळ’ आणि ‘एचआर इंटरॅक्‍ट’ यांच्या वतीने ‘एचआर मीट’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी (डावीकडून) जशन जोशी, दिनेश गुप्ता, सुदेश वर्मा, अभिजित पवार, सुनील काशीकर, पराग मेहता.

पुणे - देशात सरकार कोणाचे आहे, याचा विचार करण्यापेक्षा सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यात सहभागी झाले पाहिजे. एकत्र येऊन काम केल्यास नक्कीच बदल होतील, असा विश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

‘सकाळ’ आणि ‘एचआर इंटरॅक्‍ट’ यांच्या वतीने हॉटेल नोवोटेल येथे ‘एचआर मीट’चे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड प्रस्तुत आणि लोढा बेलमोंदो सहप्रायोजक असलेल्या मीटमध्ये लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, लोढा बेलमोंदो ग्रुपच्या विक्री विभागाचे सरव्यवस्थापक विनीत भसीन यांच्यासह शहरातील विविध नामांकित कंपन्यांचे एचआर प्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘बॅक टू दी फ्यूचर’ या विषयावर चर्चा झाली. 

पवार म्हणाले, ‘‘चर्चेच्या माध्यमातून कल्पनांचे आदान-प्रदान करण्यासाठी एचआर इंटरॅक्‍टच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. मात्र, समस्यांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. आपल्याला चांगले शिक्षण मिळाले. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या क्षेत्रात नोकरी मिळाली. पण आजही आरक्षणासाठी आंदोलने होत आहेत. त्यांची मागणी चांगले शैक्षणिक कौशल्य मिळण्याची आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटीच्या माध्यमातून सोशली रिस्पॉन्सीबल कंपनी होणे गरजेचे आहे. समाजातील मोठ्या गटाला मदत केली तर आपोआप चांगले उत्पन्न मिळते, त्यातून कर्मचारीदेखील समाधानी होतात. विविध प्रकारचे प्रोत्साहन देण्यापेक्षाही ते समाधान मोठे असते.’’

एपी ग्लोबलेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी पवार यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘शहरांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राज्यात काही स्मार्ट सिटी करण्यासाठी एपी ग्लोबलेच्या माध्यमातून सरकारी यंत्रणांना मदत करण्यात येत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.’’ 

काशीकर म्हणाले, ‘‘संवादातून नवीन कौशल्य आणि माहिती पुरविण्यावर भर आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी काही शैक्षणिक संस्थांशी चर्चा करण्यात आली आहे.’’ 

‘वर्षपूर्तीच्या वेळी सदस्यांमधून आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला, हा एक चांगला अनुभव आहे,’’ असे एचआर  इंटरॅक्‍टच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सुदेश वर्मा म्हणाले.

सहभागी झाल्याचा आनंद  
सुशील जाधव यांनी कार्यक्रमाचा एक भाग झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमात येऊन मोठा आनंद झाला. एचआर इंटरॅक्‍टच्या सदस्यांशी संवाद साधणे हा चांगला अनुभव असून, चांगल्या कल्पनांची देवाण-घेवाण झाली.’’ 

काम करायला आवडले
मीटमध्ये माझ्या कंपनीचे प्रतिनिधित्व करण्यास आनंद होत आहे. एचआर प्रतिनिधींपर्यंत पोचून त्यांच्याबरोबर काम करायला आवडले, असे विनीत भसीन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com