गणित विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Paper Leak Case

गणित विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय

सिंदखेड राजा तालुक्यामधील इयत्ता बारावी च्या एका परिक्षा केंद्रावरील गणित विषयांची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली, त्यांनतर शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रांची झाडाझडती घेतली. त्यानंतर सिंदखेड राजा पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदखेड राजा पोलिस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या गुन्हा हा साखरखेर्डा पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेला आहे. शिक्षण मंडळाकडून याची तत्काळ दखल घेऊन विभागीय सचिव अमरावती उल्हास नरड यांनी पत्रक काढून सिंदखेड राजा तालुक्यातील केंद्र क्रमांक ६०१, ६०२, ६०६, ६०८ ६०९ या पाच परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक व रनर यांना तत्काळ बदल करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्यास सांगितले आहे.

तालुक्यातील इयत्ता १२ वी च्या केंद्रसंचालक यांची तारीख ३ मार्च रोजी सायंकाळी तत्काळ बैठक घेऊन तेजराव काळे सहसचिव विभागीय परीक्षा मंडळ अमरावती यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केंद्र अध्यक्ष व रनर यांना सूचना दिल्या.

केंद्र अध्यक्ष तसेच रनल यांनी काळजी घेऊन परिक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पडण्यासाठी योग्य की खबरदारी तसेच परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना भयमुक्त व कॉपी मुक्त परीक्षा सुरळीत पाडण्याच्या तसेच यासह इतर सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद ,शिक्षण उपनिरीक्षक जगन मुंढे, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड ,सिंदखेड राजा गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे ,देऊळगाव राजा गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांच्यासह तालुक्यातील केंद्र संचालक व रनल उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabad News