बारावीची पोरं 'शंभर नंबरी' ; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

कोकण यंदाही अव्वलच, मुंबईने मात्र दुसऱ्या स्थानावर येण्याचा मान पटकावला
 HSC Result
HSC Result sakal media

मुंबई : मागील काही दिवसांपासून रखडलेला राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल (hsc result) आज जाहीर झाला. कोरोनामुळे(corona) परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन (internal work) करून विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला. असून दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांवर मंडळाने गुणांची उधळण ( huge marks) केली आहे. ( hsc result-corona-internal work-huge marks-hscallresult-nss91)

बारावीच्या परीक्षेत तब्बल 99.63 टक्के विद्यार्थी या परीक्षेत परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तरमागील वर्षांच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल 8.97 टक्क्यांनी अधिक लागला आहे. बारावीच्या परीक्षेतही कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही अधिक आहे. विशेष म्हणजे यंदाच्या परीक्षेत सर्वच विभागीय मंडळांचा निकाल तब्बल 4 ते 11 टक्क्यांनी वाढला आहे. तर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या निकालात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

 HSC Result
यंदाचा बारावी कला शाखेचा 'रेकाॅर्ड ब्रेक' निकाल! वाचा सविस्तर

बारावीच्या निकालात यंदा कला शाखेने यात मागील अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले असून या शाखेचा तब्बल 17.20 टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल व्यवसाय अभ्यासक्रमांचा 12.73 टक्के तर वाणिज्य शाखेचा 8.64 आणि सर्वात कमी निकाल हा विज्ञान शाखेचा 2.52 टक्के इतका लागला आहे.

सर्व विभागीय मंडळांतून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के तर त्या खालोखाल 99.79 टक्के मुंबई विभागाचा आणि सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा 99.34 टक्के इतका लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.73 तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.54 टक्के इतके असून मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 0.19 टक्क्यांनी जास्त आहे. पुनर्परीक्षार्थींच्या निकालाची टक्केवारी 94.31 इतकी असून 66 हजार 867 विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 HSC Result
राज्य सरकारने रुग्णालयांच्या सुरक्षेचा लेखी तपशील दाखल करावा- हायकोर्ट

राज्य निहाय मंडळाचा निकाल

मंडळ निकालाची टक्केवारी

कोकण 99.81

मुंबई 99.79

पुणे 99.75

कोल्हापूर 99.67

लातूर 99.65

नागपूर 99.62

नाशिक 99.61

अमरावती 99.37

औरंगाबाद 99.34

एकुण निकाल 99.63

- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 99.59 टक्के.

- 70 विषयांचा निकाल 100 टक्के

- 99.44 टक्के खासगी विद्यार्थी उत्तीर्ण.

- गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा यंदा नाही.

 HSC Result
यंदाचा बारावी कला शाखेचा 'रेकाॅर्ड ब्रेक' निकाल! वाचा सविस्तर

यंदा असा वाढला निकाल (टक्केवारी)

शाखा वर्ष 2020 वर्ष 2021 तुलनात्मक स्थिती

विज्ञान 96.93 99.45 2.52

कला 82.63 99.83 17.20

वाणिज्य 91.27 99.91 8.64

व्होकेशनल 86.07 98.80 12.73

एकूण 90.66 99.63 8.97

असे देण्यात आले गुणदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता अंतर्गत मुल्यमानप करून विषनिहाय गुणदान प्रदान करण्यात आले आहेत. यासाठी दहावीतील परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुण आणि बारावीतील प्रथम सत्र, सराव, तोंडी परीक्षा आणि इतर मुल्यमापन या आधारे हे गुणदान करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com