मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर

प्रशांत कांबळे
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. 

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. 

पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. 

'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई 

दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले. 

जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत) 

59,43,995 
पुणे 

56,85,895 
ठाणे 

52,64,616 
नागपूर 

52,15,541 
पालघर 

36,55,464 
मुंबई उपनगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge Amount of Alcohol Seized from Ministers District