‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार

अरबी समुद्रातील ‘महा’चक्रीवादळ आणि  बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ चक्रीवादळाची संभाव्य वाटचाल दर्शविणारा नकाशा. (स्त्रोत - हवामान विभाग)
अरबी समुद्रातील ‘महा’चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ चक्रीवादळाची संभाव्य वाटचाल दर्शविणारा नकाशा. (स्त्रोत - हवामान विभाग)

गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात इशारा; जोरदार वारे, मुसळधार पावसाचा अंदाज
पुणे - अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. उद्या गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

मंगळवारी सकाळी ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर, तर दिवपासून ७७० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६७० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर वादळ वेगाने गुजरातकडे सरकण्यास सुरवात झाली. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत वेगावान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com