हुसेन दलवाईंचा मेल हॅक करणाऱ्यांना अटक 

हुसेन दलवाईंचा मेल हॅक करणाऱ्यांना अटक 

मुंबई : राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांचा ई-मेल हॅक करून त्यांच्या संपर्क यादीतील व्यक्तींना संदेश पाठवून पैशांची मागणी करणाऱ्यांना तीन परदेशी नागरिकांना सायबर पोलिसांनी दिल्लीत अटक केली. तसेच आलेल्या ई-मेलवर विश्‍वास ठेवत दलवाई यांच्या एका मित्राने पाठवलेले 70 हजार रुपयेही पोलिसांनी परत मिळवले. 

दलवाई यांचे खासगी सचिव राजेश पांचाळ यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी 13 ऑक्‍टोबरला भादंवि कलम 419, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अमेरिकेला गेलेले दलवाई आर्थिक अडचणीत असल्याचे भासवून आरोपींनी त्यांच्या मित्रांकडे तत्काळ पैशांची मागणी करणारे संदेश पाठवले. त्यासाठी बॅंकेचा खाते क्रमांकही देण्यात आला. तसेच आपल्याला मोबाईलवर संपर्क साधू नये, असा निरोपही दलवाईंच्या नावे देण्यात आला. त्यामुळे अजित कुलकर्णी नावाच्या दलवाईंच्या मित्राने 70 हजार रुपये त्या बॅंक खात्यावर जमा केले. अखेर दलवाई यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी समाजमाध्यमातून पैसे न पाठवण्याचे आवाहन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com