मी फक्त भाजपचा मुख्यमंत्री नाही तर...

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

आपली लढाई पराभूतांसोबत

विरोधकांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी तर निवडणूकच लढवली नाही. वंचितचे अध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे आपली लढाई पराभूतांविरुद्ध असल्याने कोणतीच भीती नाही, असेही ते म्हणाले.

मुंबई : शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जात आहे. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असल्याने मी फक्त भाजपचा मुख्यमंत्री नाही. तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक युतीतच लढणार आहोत, असेही ते म्हणाले.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जनतेने युतीला चांगले मतदान केले. राज्यातील जनता माझ्यासाठी दैवत आहे. मतदारांनी दिलेला जनादेश अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, त्याचा कोणीही गर्व करता कामा नये. जनतेला गृहित धरण्याची चूक करू नका. आता कामाला लागा, असा सल्लाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. 

आपली लढाई पराभूतांसोबत

विरोधकांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी तर निवडणूकच लढवली नाही. वंचितचे अध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे आपली लढाई पराभूतांविरुद्ध असल्याने कोणतीच भीती नाही, असेही ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am not only BJPs CM I am also Shivsenas CM says Devendra Fadnavis